Google+

साप्तहिक इंटरनेट

saptahikinternet

Monthly internet

www.saptahikinternet.com

artekpublication

artekeads

artek eads

Monthly internet kolhapur

इंटरनेट साक्षरता अभियान


'इंटरनेट गुरु' या मराठी मासिकाचा अंक प्रकाशित झाला आणि आमच्या मराठी ‘इंटरनेट साक्षरता अभियाना’ला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे इंटरनेट साक्षरता अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांपासून अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवायचा आमचा मानस आहे. कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आम्ही सुरू केलेल्या या अभियानास संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे . आमच्या या समाजोपयोगी उपक्रमात आपल्याही सहभागाची गरज आहे.

आम्ही आमच्या मासिकाद्वारे इंटरनेट या बहु उपयोगी माध्यमाच्या वापराविषयी अतिशय साध्या सोप्या मायबोली मराठी भाषेतून सर्व माहिती क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांना इंटरनेट वापराबद्दलचे सर्वांगीण ज्ञान सरळ, सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने मिळणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांना इंटरनेट साक्षर बनवून त्यांना जगाबरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोतच पण तरीही या अभियानाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील इंटरनेट तज्ञांची आवश्यकता आहे तेव्हा संबंधीत तज्ञांनी या अभियानाबद्दल अभिप्राय आणि सूचना कळवून या अभियानास हातभार लावावा.

प्रिंट मिडीयाबरोबरच या मासिकाच्या प्रत्येक अंकाची ई-आवृत्तीही आम्ही प्रकाशित करत आहोत. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांपर्यंत हे अभियान निश्चितपणे पोहोचणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे.